Chandrakant Khaire | ‘मुस्लिम कुणीही औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत’
आम्ही जनतेला दाखवून देणार आहे यांचं राजकारण, कबरीवर जायची गरज काय? हा तिकडे मुद्दाम वातावरण खराब करण्यासाठी गेला. ते मुद्दाम हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी तिकडे गेले. तर आता आम्ही काय सोडणार आहे का? असा इशाराही त्यांनी दिला.
औरंगाबाद : एमआयएमचे (MIM) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आजद औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरून औरंगाबादेतील शिवसेना नेते आता आक्रमक झाले आहेत. कारण औरंगाबादेत पोहचताच ओवैसी यांनी औरंगाबदेतल्या दर्ग्यांना भेट द्यायला सुरूवात केली तसेच ते औरंगजेबाच्याही (Aurangjeb) कबरीवर पोहोचले . तिथे त्यांनी फुलं वाहिली. आणि कबरीवर डोकं टेकवलं. मात्र आता यावरून शिवेसना नेते चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, मुस्लिम लोक कोणीही त्या कबरीवर जात नाहीत. त्या कबरीवर जायचा उद्देश मला समजला नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले. त्यामुळे औरंगाबादेतल्याला राजकाणाला पुन्हा धार्मिक रंग आला आहे.
Published on: May 12, 2022 07:43 PM
Latest Videos