नरेंद्र मोदी यांना विचारा शरद पवार किती मोठे नेते आहेत; शंभूराज देसाईंच्या टीकेला ठाकरेगटाच्या खासदाराचं प्रत्युत्तर

नरेंद्र मोदी यांना विचारा शरद पवार किती मोठे नेते आहेत; शंभूराज देसाईंच्या टीकेला ठाकरेगटाच्या खासदाराचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 12, 2023 | 8:06 AM

Akola News : मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या खासदाराचं उत्तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देत म्हणाले...

अकोला : मंत्री शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. त्यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारा शरद पवार किती मोठे नेते आहेत ते, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी शरद पवार यांच्या कार्यक्रममध्ये येतात. ते कोणाला वाचवायला येतात हे सांगा आधी. पवारांचं बोट धरून राजकारण करतो, असं मोदी याआधी म्हणाले होते. यामुळे ते वयाने ज्येष्ठ आहेत. मानाने ज्येष्ठ आहेत. मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे उध्दव ठाकरे गेले याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज नाही. तुमचा पाय कुठे घसरतोय ते पाहा, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

Published on: Apr 12, 2023 08:06 AM