अक्षयची यशाला गवसणी
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो सांगतो की, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास करा. त्यातून तुम्हाला नक्की यश मिळेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील अक्षय महाडीक हा विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. निकाल लागल्यानंतर मित्रांनी अक्षयला फोन करुन सांगितल्यानंतर त्याला आपण युपीएससीची परीक्षा पास झाल्याचे कळले.अक्षय महाडीक हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून त्याने बारावी झाल्यापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याची आई प्राथमिक शिक्षिका असून त्याचे वडील कृषी सहायक म्हणून काम करतात. अक्षयने दिल्लीमध्ये अभ्यास केला असून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो सांगतो की, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास करा. त्यातून तुम्हाला नक्की यश मिळेल.
Published on: May 31, 2022 08:50 PM
Latest Videos