Akshaya Tritiya 2022 : 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात खास आरास
Pune Dagadusheth Ganapati, Video : पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीया निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.
पुणे : अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीया निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे उद्या ससून मधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्ध आश्रम ,दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
Published on: May 03, 2022 08:40 AM
Latest Videos