‘मी जागा घेतली आणि करही भरला’; वायकरांचा कोणावर पलटवार
अलिबाग मधील 19 बंगल्यांच्या आरोपांवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर टीका करत आरोप केले होते.
मुंबई : अलिबाग मधील 19 बंगल्यांच्या आरोपांवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री, शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता. तसेच त्यांनी रवींद्र वायकर यांच्यावर देखिल टीका करत आरोप केले होते. त्या टीकेला वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी वायकर यांनी मी जागा घेतली आणि करही भरला, मग कसबा जाब विचारता, जे केलं कायद्याने केलं तर चूक कशी अशा शब्दात सोमय्या यांचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर वायकर हे फक्त निमित्त आहे. खरं गणित आठ नगरसेवकांच्या जागांचं आहे. या आठ जागा जिंकण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण रवींद्र वायकर हा निमित्त आहे. ही जी जनता बसली आहे ना तीच तुम्हाला चिरडून टाकेल असेही वायकर म्हणाले.
Published on: Mar 13, 2023 07:28 AM
Latest Videos