नाशिकमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार फुटले? अजित पवार यांचे पारडे जड
एकिकडे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. तोच अजित पवार यांनी तेच नेते आणि आमदार आपल्या गटात कसे येतील याची आखणी सुरू केली आहे. यात त्यांना पहिलं यश नाशिकमधून मिळालं आहे.
नाशिक : राज्याच्या राजकारणात आता शिवसेना प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नेत्यांना कोणाच्या मागे जायचं आणि कोणाला नेता म्हणायचं अशी अवस्था झाली आहे. एकिकडे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. तोच अजित पवार यांनी तेच नेते आणि आमदार आपल्या गटात कसे येतील याची आखणी सुरू केली आहे. यात त्यांना पहिलं यश नाशिकमधून मिळालं आहे. तर शरद पवार यांना येथे पहिला धक्का लागला आहे. नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 6 आमदार हे अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. तर याच्याआधीच छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर त्यानंतर आता दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे आमदार देखील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तर याच राज्यकीय घडामोडींमुळे नरहरी झिरवाळ हे नॉटरिचेबल होते. तर ते विधान सभेच्या उपाध्यक्ष पदावर असल्याने त्यांना माध्यमांसमोर न जाण्याच्या सूचना अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे कळत आहे.