मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, काय म्हणाले संजय राऊत
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदाच्या निवडणूकात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे. सिनेटच्या दहाच्या दहा जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर पदवीधर सुशिक्षित मतदारांनी विश्वास दाखविला आहेत.
मुंबई विद्यापीठावर अखेर भगवा भडकला आहे. सिनेटच्या निवडणूकीत दहाच्या दहा उमेदवार शिवसेनेचे निवडून आले आहेत. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. पदवीधर मतदार संघात विजय झाला आता सिनेटमध्ये विजय झाला आहे. शेवटचा उमेदवार त्याची मते सवा आठशे आहेत. एबीव्हीपीच्या सर्व उमेदवाराची हे मतदार न ईव्हीएम होत नाही, बॅलेटवर मतदान होते. त्यामुळे काही गडबडी करता येत नाही. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी युवासेना पर्यायाने शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आधी हे निवडणूकाच होऊ देत नव्हते. परंतू कोर्टाचा दट्ट्या बसल्या नंतर यांना नाईलाजाने निवडणूक घ्यावी लागली. त्यात युवासेनेचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्यावर पदवीधर सुशिक्षित मतदारांनी विश्वास दाखवला आहे. पदवीधर मतदार सुशिक्षित असून तो विकला जात नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.