Amrvati Rain | अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले, धरण क्षेत्रात जोरदार प्रवास
वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 ही दरवाजे उघडले आहेत. अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे 70 सेमी तर 4 दरवाजे 60 सेमी ने उघडले आहेत. धरणाच्या 13 हि दरवाजाच्यातुन आता 1392 क्यूसेक विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडन्यात आला. तर धरण 80 टक्के भरलं आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने मध्यरात्री उघडले सर्व 13 दरवाजे आहेत. वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
Published on: Jul 15, 2022 10:38 AM
Latest Videos