Maratha reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य : दीपक केसरकर
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मान्य, दीपक केसरकर यांची माहिती
Maratha reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. आदरणीय जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आतापर्यंत 37 लाखांपर्यंत आपण कुणबी प्रमाणपत्र वाटप करू शकलो. आणखी देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप होत आहेत 50 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.
बैठकीत नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी चर्चा झाल्यानंतर ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Published on: Jan 26, 2024 12:45 PM
Latest Videos