पाटण्यात विरोधक एकवटले; भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय

पाटण्यात विरोधक एकवटले; भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय

| Updated on: Jun 24, 2023 | 7:38 AM

बिहारची राजधानी पटणा येथे देशातील विरोधकांची बैठक पार पडली. यावेळी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पटणा : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देशातील प्रमुख विरोधकांच्यात एकजूट दिसून आली. बिहारची राजधानी पटणा येथे देशातील विरोधकांची बैठक पार पडली. यावेळी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर देशातील प्रमुख 15 विरोधी पक्षनेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एम के स्टॅलिन, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, दीपांकर भट्टाचार्य, महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे उपस्थित होते.

Published on: Jun 24, 2023 07:38 AM