Kishori Pednekar | सर्वच जण वॉशिंग मशीनमधून धुऊन आले, अब्दुल सत्तार यांच्यावरील घोटाळ्याप्रकरणात किशोर पेडणेकर यांचा टोला
Kishori Pednekar | अब्दुल सत्तारसह सर्वच जण आता वॉशिंग मधून धुऊन आल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
Kishori Pednekar | अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याप्रकरणात (TET Scam) आरोपांची राळ उडलेली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आता सर्वच जण वॉशिंग मशीनमधून धुऊन आल्याचे सांगितले. ईडीच्या धाकाने जे शिंदे गटात अथवा भाजपमध्ये (BJP) गेले. ते धुऊन निघाल्याचा टोला लगावत, कायदा, घटनेची तोडमोड सुरु असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. सध्या महाराष्ट्राचा पदोपदी अपमान सुरु आहे. नेहमीचं त्याचं दर्शन होतं, असं सांगत जास्त महसूल देऊन ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला (CM Eknath Shinde) मागच्या रागेत उभं करुन महाराष्ट्राचा अपमान केल्या जात असल्याचे त्या म्हटल्या. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची सुपारीच घेतल्याची खोचक टीका ही त्यांनी केली. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आहे, तरीही लोकशाही मानत असल्याने आणि कायदा मानत असल्याने शिवसेनेने चिन्हासाठी दाद मागितल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.