दोन शेतकरी नेते एकमेकांना भिडणार, ‘त्या’ आरोपांचा होणार सामना
उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्याचे आदेश शिस्तपालन समितीने दिले आहेत. रविकांत तुपकर यांच्यासह प्रशांत डिक्कर यांनाही बैठकीची नोटीस पाठविण्यात आली आहे.
बुलढाणा । 7 ऑगस्ट 2023 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्यावर आरोप करणे रविकांत तुपकर यांना भोवले आहे. काही दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर मोठे आरोप केले होते. उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्याचे आदेश शिस्तपालन समितीने दिले आहेत. रविकांत तुपकर यांच्यासह प्रशांत डिक्कर यांनाही बैठकीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या दोघानाही शिस्तपालन समिती तसेच कोअर कमिटी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर आरोप केले हते तर तुपकर आणि डीक्कर यांच्यामध्ये वाद आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीला हे दोन्ही नेते हजर राहणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविकांत तुपकर सध्या नॉट रीचेबल आहेत