Special Report | अमोल मिटकरींवर 10 टक्के कमिशनचा आरोप
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळ आवारात आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. तर आता अकोला जिल्ह्यात त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा जाहीर आरोप केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.
Published on: Sep 02, 2022 12:26 AM
Latest Videos

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले

दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
