Radhakrishna Vikhe Patil यांच्या साखर कारखान्यात १९१ कोटी रुपयांचा घोटाळा? काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 19, 2023 | 11:59 PM

VIDEO | देशद्रोही झाकीर नाईककडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेत पैसे आल्याच्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांच्याकडून विखेंवर नव्या आरोपांवरुन निशाणा

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा नगरच्या साखर कारखान्यात १९१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आरोप केला आहे. त्यावर विखे-पाटलांनी काय स्पष्टीकरण दिल आहे. देशद्रोही जाकीर नाईककडून विखेंच्या संस्थेत पैसे आल्याच्या आरोपानंतर संजय राऊतांनी विखेंवर नव्या आरोपांवरुन निशाणा साधला आहे. विखे पाटलांच्या प्रवरानगर सहकारी साखर कारखान्यात 191 कोटींच्या घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. तर हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणत विखेंनी ते फेटाळून लावले आहेत.

नगरच्या प्रवरानगरमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखाना आहे. जो राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात आहे. याच प्रवरातल्या शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज व्यवहार झाल्याचं म्हणत घोटाळ्याचा आरोप केलाय विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवाल आणि ताळेबंदात फेरबदल करुन 191 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झालाय. बघा नेमकं काय आहे प्रकरण?

Published on: Sep 19, 2023 11:56 PM
लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधेयक मंजूर, पण अंमलबजावणी कधी?
Ganesh Chaturthi 2023 | छोट्याशा सुपारीवर पठ्ठ्यानं साकारलं बाप्पाचं देखणं रूप, बघा व्हिडीओ