Maratha Reservation : मराठ्यांपाठोपाठ कोणत्या जातींच्या सापडल्या कुणबी नोंदी? जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती काय?
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मराठा कुणबी अशा 138 नोंदी सापडल्या आहे. येडशी येथे ब्राह्मण, माळी, अधिवासी ठाकर, पोतराज, लिंगायत वाणी समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तर 1866 ते 1920 या काळातील शालेय शिक्षणाच्या विद्यार्थी नोंदीवर कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत.
धाराशिव, १९ नोव्हेंबर २०२३ : धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी सोबत ब्राह्मण, माळी, वाणी, ठाकर, पोतराज समाजाच्या लोकांची कुणबी अशी नोंद सापडली आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मराठा कुणबी अशा 138 नोंदी सापडल्या आहे. येडशी येथे ब्राह्मण, माळी, अधिवासी ठाकर, पोतराज, लिंगायत वाणी समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तर 1866 ते 1920 या काळातील शालेय शिक्षणाच्या विद्यार्थी नोंदीवर कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत. शेती करणारा कुणबी म्हणून सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या, येडशी गावातील लोकांनी अशी मागणी केली आहे. 150 वर्ष जुनी शाळा आहे. तिथे ब्रिटीश कालीन काही जातींच्या नोंदी आढळून आल्या आहेत. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मराठा कुणबी अश्या 138 नोंदी सापडल्या आहेत, अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे.
Published on: Nov 19, 2023 05:10 PM