Devendra Fadnavis | आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही! : देवेंद्र फडणवीस-TV9

Devendra Fadnavis | आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही! : देवेंद्र फडणवीस-TV9

| Updated on: Jun 15, 2022 | 8:07 PM

फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान असल्याचे म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका करताना जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही.

जालना : राज्यातील विविध प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government)भाजपने मोर्चे काढण्यास टार्गेट केलं होतं. याच्याआधी औरंगाबादमध्ये भाजपकडून पाण्याच्या मुद्द्यावर जलक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जो पर्यंत राज्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी आता केलं आहे. आज औरंगाबाद प्रमाणेच जालन्यात ही भाजपकडून जालन्याचा पाणी प्रश्नावरून (Jalna water issue)फडणवीस यांनी विराट मोर्चा काढत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही असं म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान असल्याचे म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका करताना जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 15, 2022 08:07 PM