“संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी एकमेकांना जेलमधील अनुभव सांगितले असतील!”
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवेसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख भेट यांच्या भेटीवर टीका केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
अमरावती : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवेसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख भेट यांच्या भेटीवर टीका केली आहे. “संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची जी भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी कारागृहामधील अनुभव एकमेकांना शेअर केले असतील”, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. कोण कोण तिथं भेटलं? काय काय प्लॅन केला? पुढचं काही नियोजन केलं का त्याच्यासाठी भेट घेतली असेल. जेलमधील अनुभव मांडण्यासाठी ते पुस्तक लिहितीलच संजय राऊत. पण त्यात ते अनिल देशमुख यांचेही अनुभव लिहितील, असंही अनिल बोंडे म्हणाले आहेत. अनिल बोंडे अमरावतीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 15, 2023 04:06 PM
Latest Videos