जालन्याच्या अंतरवालीतील ‘त्या’ घटनेवरून तिघांना अटक, जरांगे पाटील यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Nov 26, 2023 | 9:59 AM

पुराव्याच्या आधारे अंबड पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर गुन्हे मागे घेणार होतात मात्र आता अटक सुरू झाली, सरकारचा नेमका कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील दगडफेक प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुराव्याच्या आधारे अंबड पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर गुन्हे मागे घेणार होतात मात्र आता अटक सुरू झाली, सरकारचा नेमका कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. या प्रकरणात आरोपी ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसाट आणि कैलास सुखसे अशी या तिघांची नावं असून त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशी कलमं लावण्यात आली आहेत. ऋषिकेश बेदरे या आरोपीकडून अंबड पोलिसांनी जीवंत काडतूसं आणि गावठी पिस्तुल जप्त केली आहे. याप्रकरणावर काय केलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य?

Published on: Nov 26, 2023 09:55 AM
मेहुण्यावरचं प्रेम, एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा गेम? काय आहे प्रकरण?
Assembly Elections 2023 : पाच राज्यातील चषक कोण जिंकणार?, सामनातून भाजपवर घणाघात