“औरंगजेबाच्या नावावर भाजपचं राजकारण सुरु”, ठाकरे गटाची टीका
आळंदी येथे झालेल्या वारकऱ्यावरील लाठीचार्जचा सर्वच स्तरावरून निषेध केला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे.
औरंगाबाद : आळंदी येथे झालेल्या वारकऱ्यावरील लाठीचार्जचा सर्वच स्तरावरून निषेध केला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे.”हिंदुत्वाच्या बाबतीत हे सरकार फक्त घोषणा करते. परंतु सरकार हिंदुत्ववादी विरोधी आहे, अशी स्थिती आहे. औरंगजेबाचा फोटो पहिल्यांदा औरंगाबादमध्ये नाचवण्यात आला. नंतर अहमदनगरमध्येही औरंगजेबाचे पोस्टर दिसले. नंतर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. परंतु पहिल्याच वेळी जर सरकारने कडक कारवाई केली असती तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात दुसऱ्यांदा पोस्टर लावण्याची हिंमत कोणी केली नसती. औरंगजेबाचं नाव घेऊन भाजप राजकारण करत आहे. औरंगाबादमधील औरंगजेबाच्या स्मारकाचा केंद्राचा सुरक्षित दर्जा काढून घ्या, अशी मी मागणी केली आहे. जातीय तनाव निर्माण करण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.