Ambadas Danve : आधी निवडून आलेले सांभाळा, बारामती जिंकणं सोपं नाही; भाजपा नेत्यांना अंबादास दानवेंची सुनावलं
दसरा मेळाव्यावरूनही त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ज्याच्या मागे जनता त्यांचाच दसरा मेळावा होणार, असे ते म्हणाले. गद्दारी करून लोक दसऱ्याला नाक वर करून चालू शकत नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद : जे निवडून आलेले आहेत, त्यांना आधी भाजपाने (BJP) सांभाळावे. आतापर्यंत भाजपा शिवसेनेबरोबर युतीत होती. बरेच मतदारसंघ शिवसेनेबरोबर असल्यामुळे भाजपा जिंकत आलेली आहे. जास्तीत जास्त जागा जिंकणे हे प्रत्येक पक्षाचे टार्गेट असते. पण बारामती (Baramati) जिंकणे सोप आहे, असे मला वाटत नाही, असा टोला शिवसेना आमदार आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपाला लगावला आहे. दसरा मेळाव्यावरूनही त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ज्याच्या मागे जनता त्यांचाच दसरा मेळावा होणार, असे ते म्हणाले. गद्दारी करून लोक दसऱ्याला नाक वर करून चालू शकत नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. याकुब मेमनच्या प्रश्नी त्यांनी भाजपावर टीका केली आहे. कुणाच्या काळात काय झाले, याचा मोठा पाढाच वाचावा लागेल, असे ते म्हणाले.