Ambadas Danve : हेच तानाजी सावंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मागे सातत्यानं धावत होते, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Ambadas Danve : हेच तानाजी सावंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मागे सातत्यानं धावत होते, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

| Updated on: Aug 02, 2022 | 7:05 PM

आदित्य ठाकरे कोण, तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्यांच्यावर एकेरी टिकास्त्र केले. त्यावर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला.  त्यांनी कोणाची किंमत कमी केली म्हणून आदित्य ठाकरेंची किंमत कमी होईल, असे नाही, असे दानवे म्हणाले.

औरंगाबाद : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कोण हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. तानाजी सावंत काय बोलतात याची फार दखल घेण्याची गरज नाही, असे शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहे. आदित्य ठाकरे कोण, तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्यांच्यावर एकेरी टिकास्त्र केले. त्यावर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला.  त्यांनी कोणाची किंमत कमी केली म्हणून आदित्य ठाकरेंची किंमत कमी होईल, असे नाही. ते उद्धव, आदित्य यांच्यामागे धावत होते. यापेक्षा खालचे शब्द मी वापरणार नाही, कारण मी त्यांचाही आदर करतो, असे दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्य बोलतात, एकनाथ शिंदे काय करणार, त्यांनी जे काही करायचे ते त्यांनी केलेले आहे. असे ते म्हणाले. अनंत दिघे यांचे सत्य एकनाथ शिंदे यांनी का लपवून ठेवले, याची एकनाथ शिंदे यांची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Published on: Aug 02, 2022 07:05 PM