Ambadas Danve | दिल्लीचे पातशाह हैदराबाद येथे येणार असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी अभिवादानाची वेळ बदलली, अंबादास दानवे यांची खरमरीत टीका
Ambadas Danve | दिल्लीचे पातशाह हैदराबाद येथे येणार असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनातील शहिदांना अभिवादन करण्याची वेळ बदलली, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
Ambadas Danve | दिल्लीचे पातशाह हैदराबाद येथे येणार असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनातील शहिदांना अभिवादन करण्याची वेळ बदलली, अशी खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. या अभिवादान कार्यक्रमाची नियोजीत वेळ सकाळी 9:05 मिनिटांनी असते. दरवर्षाची ही परंपरा आहे. पण यंदा मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद येथे नरेंद्र मोदी यांना भेटायला जायचे असल्याने नियोजीत वेळे अगोदरच अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले.
मुख्यमंत्र्यांनी शहिदांचा अवमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच शिवसैनिक, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा अभिवादन कार्यक्रम नियोजीत वेळी केला. मुख्यमंत्र्यांच्या अशातील दौऱ्यांमध्ये शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. आजच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांवर शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.