‘जनता आता तोंडात शेण घालू लागली’; कडू यांच्या आंदोलनावर ठाकरे गटाच्या नेत्याची आगपाखड
ते आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्यावर जन एल्गार मोर्चा काढणार असून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत. यावेळी हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत.
औरंगाबाद, 9 ऑगस्ट 2023 । प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू हे आपल्याच सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. ते आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्यावर जन एल्गार मोर्चा काढणार असून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत. यावेळी हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. तर या मोर्चाच्या आधी कडू यांचे अमरावतीत पोस्टर्स, बॅनर्स लागले आहेत. तर झुकेगा नही साला अशा आशयाचे बॅनर्स अमरावतीत पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कडू यांच्या या मार्चावरून टीका केली आहे. दानवे, त्याची सोयीची भूमिका असते. ते एकीकडे वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत. तर याच्या आधी यांनीच लग्नात गेलं की जनता आपल्याला गद्दार, खोके म्हणून टीका करायची असे म्हणतच होते. त्यांनीच नंतर कबूल केलं होतं की फडणवीस यांनी फोन केल्यानंच मी गोवाहाटीला गेलो. ही हा डुप्लिकेटपणा आहे. जनता आता तोंडात शेण घालू लागली आहे.

पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?

हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत

'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
