‘सोमय्यांचा व्हिडिओ आला त्याच्यावर आधी यांनी बोलावं’; भाजपवर शिवसेना नेत्याचा हल्लाबोल
यावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या महिल्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. तर येथे मुंबईत देखील भाजपच्या महिला नगर सेविकांसह पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील फ्लाइंग किस प्रकरणावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. यावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या महिल्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. तर येथे मुंबईत देखील भाजपच्या महिला नगर सेविकांसह पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपला कडक सवाल केला आहे. यावेळी दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रश्न करणाऱ्यांनी आधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबतीत बोलावं असं म्हटलं आहे. तर सोमय्यांचा व्हिडिओ आलं त्याचे काय झाले ते आधी सांगावं असं आवाहन केलं आहे. तर यावरून आणखीन काय म्हटलं आहे दानवे यांनी पाहा या व्हिडीओत…
Published on: Aug 10, 2023 02:15 PM
Latest Videos