‘मणिपूरला जाऊन काय करणार? अकोला, कोल्हापूर, शेवगाव, हे पहा म्हणावं’; शिंदे यांच्या कोणाची खरमरीत टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीत बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे
मुंबई : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू झालेला हिंसाचार बांबण्याचे नाव घेत नाही आहे. येथे 50 दिवस होऊन गेले तरी हिंसाचार होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारसह मणिपूर राज्य सरकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावरूच चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीत बैठक बोलवली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे हे मणिपूर प्रश्नावर काय करतील? असा सवाल करत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर शिंदे यांनी आपलं अकोला, कोल्हापूर, शेवगाव, हे पहावं असा टोला लगावला आहे.
Published on: Jun 24, 2023 02:20 PM
Latest Videos