‘पवार यांची क्षमता मान्य असताना कशाला त्यांच्यावर टीका करता?’, शिवसेना नेत्याचा मोदी यांना सवाल
त्यांच्या पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आरोपानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. यानंतर आता मोदी यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं. शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता होती मात्र काँग्रेसने तसे होऊ दिले नाही, असे मोदी म्हणाले.
औरंगाबाद, 9 ऑगस्ट 2023 । शरद पवार यांच्या पक्षावर एक महिन्याच्या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले होते. त्यांच्या पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आरोपानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. यानंतर आता मोदी यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं. शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता होती मात्र काँग्रेसने तसे होऊ दिले नाही, असे मोदी म्हणाले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावरून आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, मोदी यांनी याच्या आधी त्यांच्या पक्षावर आरोप केले होते. त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आता पंतप्रधान मंत्री हे पवार यांच्या पंतप्रधान पदाच्या विषयावर बोलत आहेत. हा त्यांचा दुटप्पी पणा आहे.