‘मोदी शाह यांना महाराष्ट्राचा धस्का बसलाय’; ठाकरे गटाच्या नेत्याची शाह-मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका
यावेळी त्यांनी भाजपशी संबंधीत घटकांशी आपला संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केलीय.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भेटीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपशी संबंधीत घटकांशी आपला संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केलीय. दानवे यांनी, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी शरद पवारांनी खुलासा केलेला आहे. आणि त्यांनी सुस्पष्टपणे बोललेले आहेत. निश्चित संभ्रम निर्माण होतो ही भूमिका जरी योग्य असली तरी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध असतात. काही नाती असतात आणि याच्यामुळंच एखादी भेट झाली असेल. परंतु त्याच्यानं फार मोठा स्फोट होईल किंवा असं काही झालं असेल असं समजण्याची गरज नाही. असं होत असताना रोज अफवा किंवा असत्यता पसरवली जाते. मात्र आता दिल्लीच्या लोकांना महाराष्ट्रातच घर करावे लागतं की काय असे मला वाटतं. कारण तशी स्थिती निर्माण झाली आहे. एक दिवस मोदी, एक दिवस अमित शाह महिन्यातून एकदा दोनदा येतात याचा अर्थ महाराष्ट्राचा धसका त्यांना बसलेला आहे, हे नक्की. भाजप स्वतःच्या ताकदीवर जिंकू शकत नाही हे त्यांना सुस्पष्टपणे आता कळालेलं आहे. म्हणून शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी.