Cabinet Expansion : ‘मंत्रिमंडळ विस्तार झाला तर हे सरकारच पडेल’; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Cabinet Expansion : ‘मंत्रिमंडळ विस्तार झाला तर हे सरकारच पडेल’; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 17, 2023 | 1:48 PM

G 20 परिषदेच्या समारोपाला उपस्थिती राहण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याचे समजते. तर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जाहिरात वादानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आता यावरूनच ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होताना दिसत आहे.

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तर ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच ते G 20 परिषदेच्या समारोपाला उपस्थिती राहण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याचे समजते. तर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जाहिरात वादानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आता यावरूनच ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरूनच टीका करताना, ते दिल्लीत दर महिन्याला पातशहाला मुजरा करण्यासाठी जात असावेत असा टोला लगावला आहे. तर मंत्रीमंडळ विस्तार हा होणार नाही. तो एक भूलभलय्या आहे. तर शिंदे-भाजप गटानं आमदारांना लॉलीपॉप दाखवलं आहे. प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर सरकारच राहणार नाही. कारण जसे शिंदे यांच्या गटात अनेक इच्छुक आहेत. तसेच भाजपमध्ये देखील. त्यामुळे भाजप आणि सेनेला मंत्रिमंडळ विस्तार नको आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 17, 2023 01:48 PM