Ambadas Danve | ‘संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला 50 माणसं येईनात’, अंबादास दानवेंचा टोला
Ambadas Danve | संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला 50 माणसं येईनात, असा टोला शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
Ambadas Danve | संदीपान भुमरेंच्या (MLA Sandipan Bhumare) कार्यक्रमाला 50 माणसं येईनात, असा टोला शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लगावला. हे वक्तव्य येण्यापूर्वी आमदार भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार आपल्या संपर्कात असल्याचे गौप्यस्फोट करुन आज चर्चा घडवून आणली होती. दरम्यान भुमरे यांच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. त्यात गर्दी अभावी बऱ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले. नेमका हाच धागा पकडून दानवे यांनी ज्यांना कार्यक्रमाला गर्दी खेचता येत नाही, ते दोन आमदार संपर्कात असल्याचा टोला लगावत भुमरे यांच्या दाव्याची पोलखोल केली. कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या दिसल्यावर दानवे यांनी भुमरे यांना टोला लगावला. त्यांच्या कार्यक्रमाला 50 माणसं ही येत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
Latest Videos