नितेश राणे यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरन ठाकरे गटाच्या नेत्याचा पलटवार, दोनच शब्दात पाणउतारा
ठाकरे गटातील खासदार आणि आमदार यांना निवडणुकीसाठी आता चिन्ह मिळणार नाही. म्हणून त्यांना घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्यानेच उद्धव ठाकरे हे विलिनीकरणाचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत असा घणाघात केला.
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लवकरच राष्ट्रवादीत विलीन होणार आणि त्यांना ती करावी लागणार? ठाकरे गटातील खासदार आणि आमदार यांना निवडणुकीसाठी आता चिन्ह मिळणार नाही. म्हणून त्यांना घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्यानेच उद्धव ठाकरे हे विलिनीकरणाचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत असा घणाघात केला. त्यावरून आता ठाकरे गटाकडून त्यांच्या या टीकेला उत्तर दिलं जात आहे. या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोनच शब्दात नितेश राणे यांचा थेट पाणउताराच केला आहे. त्यांनी नितेश रानेबद्दल काय बोलायचं? त्यांचा जन्म इथे झाला ते मोठे इथे झाले शिवसेनेत झालेत. कोणाबद्दल काय बोलावं याच त्यांनी भान ठेवायला हवं एवढंच सांगेन असं म्हटलं आहे.