“पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांची भाजपमध्ये घुसमट”, ठाकरे गटाचा दावा
"पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांची भाजपमध्ये घुसमट सुरु", असल्याचा दावा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. "पंकजा मुंडे यांनी हजारो भाजप कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली.
औरंगाबाद : “पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांची भाजपमध्ये घुसमट सुरु”, असल्याचा दावा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. “पंकजा मुंडे यांनी हजारो भाजप कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावं लागलं आहे, त्यामुळे एक दिवस पंकजाताई यांनाही न्याय मिळेल”, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गोरेगाव पत्राचाळ प्रकरणावर संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे. यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. ” संजय शिरसाट यांनी आपल्या मतदारसंघातील पडलेल्या चाळीबद्दल पाहावं, दोन-चार लोकं सोजडे तर बाकीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कधीच नव्हते”, असंही दानवे म्हणाले.
Published on: Jun 01, 2023 03:47 PM
Latest Videos