छत्रपती संभाजीनगरमधील राड्याला भाजप-एमआयएम जबाबदार; अंबादास दानवे यांचे गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगरमधील राड्याला भाजप-एमआयएम जबाबदार; अंबादास दानवे यांचे गंभीर आरोप

| Updated on: Mar 30, 2023 | 10:53 AM

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाला. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. शहरातील या दंगलीनंतर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अंबादास दानवे यांनी भाजप आणि एमआयएमवर आरोप केले. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात राडा झाला. या भागाची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किराडपुरा परिसरातल्या या राड्याला भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. काल रात्री झालेला राडा कुणी घडवला? हे शोधून काढण्यात यावं. लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम भाजप आणि एमआयएम करत आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल पाहिजे आहे. केवळ मतांसाठी हे सगळं राजकारण सुरुये. दंगली घडत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

Published on: Mar 30, 2023 10:45 AM