सूरज चव्हाण, सुजित पाटकर यांच्यावरील ईडी धाडीवर अंबादास दानवे म्हणतात, “सर्वांना न्याय…”
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरीही ईडीने धाड टाकली असून एकूण 10 ठिकाणी ईडी कारवाई करत आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांच्या घरी ही धाड टाकण्यात आली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरीही ईडीने धाड टाकली असून एकूण 10 ठिकाणी ईडी कारवाई करत आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांच्या घरी ही धाड टाकण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. या धाडींवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्तेचा दुरुपयोग आणि बदलाची भावना अशा पध्दतीने या धाडीचे वर्णन करता येईल. जाणीवपूर्वक या धाडी टाकल्या आहेत. सत्तेचा माज आणि मस्ती या धाडींमध्ये दिसतेय. शिंदे गटातील नेत्यांवर धाडी का पडत नाहीये. ठाण्यात का चौकशी होत नाही. बाकीच्या ठिकाणी एजंटच भाजपच्या नावावर आहे. ठाण्यात दादागिरी करून साहित्य घेतलं गेलं, त्याचा वापर अद्याप झालेला नाहीये. त्याची ईडी चौकशी करा,” असं दानवे म्हणाले.