एकनाथ शिंदे यांना एक वर्ष मुख्यमंत्री राहायचा वायदा होता, आता..., अंबादास दानवे यांचं मोठं विधान

“एकनाथ शिंदे यांना एक वर्ष मुख्यमंत्री राहायचा वायदा होता, आता…”, अंबादास दानवे यांचं मोठं विधान

| Updated on: Jul 24, 2023 | 7:52 AM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौऱ्याने या चर्चां आणखी वाढल्या आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई, 24 जुलै 2023 | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौऱ्याने या चर्चां आणखी वाढल्या आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी चर्चा आणि दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंना एक वर्ष मुख्यमंत्रीपदी राहायचा वायदा होता. एक वर्ष आता संपलं आहे. त्यामुळे आता घरी जावं. हे आम्ही अधिकाऱ्यांकडून, भाजप गोटातून आणि पत्रकारांकडून ऐकत आहोत.याला पुरक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जात आहे. अजित पवार फक्त उपमुख्यमंत्री होण्यासाठी गेले नाहीत. याआधीही ते उपमुख्यमंत्री अनेकदा झाले आहेत.”

 

Published on: Jul 24, 2023 07:52 AM