भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं केडर सांभाळावं, ठाकरे गटाचा सल्ला

“भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं केडर सांभाळावं”, ठाकरे गटाचा सल्ला

| Updated on: May 30, 2023 | 1:07 PM

सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.यावर विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.यावर विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मध्यंतरी राज ठाकरे यांनी भाजप विरोधात वक्तव्ये केली होती. त्यामुळं ते मनधरणी करण्यासाठी गेले असतील”, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. तसेच भाजप नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप अस्वस्थता आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्ते खूश झाले, कारण बेबंदशाहीला आळा बसला, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

Published on: May 30, 2023 01:07 PM