‘या’ एका कृतीने स्पष्ट होतं की सरकार अकार्यक्षम; ठाकरेगटाची टीका
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकारवरही त्यांनी टीका केली आहे. पाहा...
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे सरकारवर टीका केली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी दहा मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती आहे. याचा अर्थ हे 10 मंत्री अकार्यक्षम होते. त्यामुळे हे सरकारच अकार्यक्षम असल्याचं स्पष्ट होतंय, अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या परवानगी शिवाय काहीही करू शकत नाहीत, असं म्हणत दानवेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय.
Published on: Jan 24, 2023 11:24 AM
Latest Videos