“उद्धव ठाकरे यांना कोणी घरी बसवू शकत नाही”, एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाचा पलटवार
शनिवारी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
औरंगाबाद: शनिवारी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “ठाकरे यांना कोणी घरी बसवू शकत नाही, ठाकरे मैदानात आहेत, आणि या मैदानातील जनता त्यांच्या सोबत आहे. उलट तुम्ही शासकीय यंत्रणेचा आधार घेऊन लोक तुम्हाला जमा करावे लागते. पक्ष म्हणून कोण येतं का ते बघा. फडवणीस निष्कलंक आहेत हे खुलासा तुम्हाला करावा लागतो यातच तुम्ही कलंकित आहात हे येते.”

आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका

कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले

त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?

तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
