Mumbai Local Trains Mega Block : अंबरनाथ ते कर्जत रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार; काय आहे कारण पाहा व्हिडिओ
बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्जत दिशेचा पादचारी पूल धोकादायक बनल्यानं काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळं प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून स्कायवॉकने पूर्ण पश्चिमेचा प्रवास करावा लागत होता. याच जुन्या पादचारी पुलाच्या बाजूला आता नवीन पादचारी पूल उभारण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलंय.
मुंबई: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ(Ambernath) ते कर्जत(Karjat) रेल्वे स्थानकांदरम्यान उद्या रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात पादचारी पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक(Mega Block ) घेण्यात येणार असून त्यामुळं सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्जत दिशेचा पादचारी पूल धोकादायक बनल्यानं काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळं प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून स्कायवॉकने पूर्ण पश्चिमेचा प्रवास करावा लागत होता. याच जुन्या पादचारी पुलाच्या बाजूला आता नवीन पादचारी पूल उभारण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलंय.
या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचं काम उद्या रविवारी करण्यात येणार आहे. यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकातून होणारी दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. यासाठी अंबरनाथ ते कर्जत या सेक्शनमध्ये सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत संपूर्ण रेल्वेसेवा बंद ठेवली जाणार आहे.
या काळात मुंबईकडे येणाऱ्या हैद्राबाद सीएसएमटी एक्स्प्रेस आणि कोइंबतूर एलटीटी एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत पनवेल दिवा या मार्गानं वळवून पुढे मुंबईकडे नेल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलाय. दिव्याचा प्लॅटफॉर्म लहान असल्यानं या गाड्या २ वेळा थांबवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.