VIDEO : पाऊस आला, बरलसा अन् त्याच्यासोबतच ‘हा’ धबधबाही खळाळला..!
गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा हा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत. तर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत नसल्यामुळे काहीसा निराशा पर्यटकांमध्ये आहे.
अंबोली (सावंतवाडी) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून ओळख असणाऱ्या आंबोलीत अखेर पावसाने आपली हजेरी लावलीच. गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा हा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या अंबोली घाटातील हाव आंबोली धबधबा पाऊस पडत असल्यामुळे प्रवाहित झाला आहे. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आंबोली धबधब्याकडे वळू लागले आहेत. गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाका वाढू लागला होता. पण गेल्या आठ दिवसापासून कोकण परिसरामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आंबोली धबधबा वाहू लागला आहे. तसेच संपूर्ण आंबोली घाटामध्ये धुक्याची चादर पसरली आहे याचा मनमोहक आनंद पर्यटन घेत आहेत. धबधब्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. तर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत नसल्यामुळे काहीसा निराशा पर्यटकांमध्ये आहे.