नागपुरात काही पंपावर पेट्रोल अन् डिझेल संपलं, इंधन तुटवड्याचा रुग्णवाहिकांना फटका
पेट्रोल आणि डिझेल न मिळाल्याने मेयो रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका उभ्या आहेत. नागपुरातील काही पेट्रोलपंपर पेट्रोल आणि डिझेल संपलं आहे. दरम्यान वेळेवर इंधन न मिळाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर, २ जानेवारी २०२४ : पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा फटका नागपुरात अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकांना बसताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेल न मिळाल्याने मेयो रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका उभ्या आहेत. नागपुरातील काही पेट्रोलपंपर पेट्रोल आणि डिझेल संपलं आहे. दरम्यान वेळेवर इंधन न मिळाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा असल्याने आणि काही ठिकाणी इंधनच संपल्यामुळे रुग्णवाहिका चालक चिंता व्यक्त करत आहे. वाहनात असलेल्या इंधनावरच एखादा गंभीर रूग्ण नेण्याची वेळ आली आणि रस्त्यातच इंधन संपलं आणि रूग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाही तर याला जबाबदार कोण असणार असा सवाल आता रूग्णवाहिका चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
Published on: Jan 02, 2024 11:53 AM