जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड; मनसैनिकांचा संयम सुटला तर..., कोणी दिली इशारा?

“जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड; मनसैनिकांचा संयम सुटला तर…”, कोणी दिली इशारा?

| Updated on: Jun 16, 2023 | 11:37 AM

Raj Thackeray, MNS, Jitendra Awhad, Ameya Khopkar,राज ठाकरे, मनसे, जितेंद्र आव्हाड, अमेय खोपकर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून त्यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स अनेक ठिकाणी झळकले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. नुसतं मिमिक्रीकरून चालणार नाही मेहनत घ्यावी लागेल असं आव्हाड म्हणाले. यावर आता मनसे नेते अमेय खोपकर यानी प्रतिक्रिया दिली आहे. “राज साहेबांचा वाढदिवस म्हणजे हा उत्साह आहे. त्याच्यात मिठाचा खडा घालण्यासाठी जितेंद्र आव्हाडासारखी विघ्न संतोषी माणसं जन्माला आलेली आहेत.त्यांना कधीही दुसऱ्याचा उदो उदो झाल्याचा आवडला नाही.जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे.राज ठाकरे यांच्याविषयी बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांची पात्रता नाही. उद्या मनसे सैनिकांचा संयम तुटला तर तुम्हाला इकडे तिकडे जाणं मुश्किल होईल,” असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.

Published on: Jun 16, 2023 11:37 AM