स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता, नाना पटोले यांची टिका

स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता, नाना पटोले यांची टिका

| Updated on: Jul 21, 2024 | 5:40 PM

'फेक नरेटिव्ह' या शब्दावरुन सध्या राजकारणात खूपच खळबळ उडाली आहे. भाजपाच्या 'फेक नरेटिव्ह'ला उत्तर देण्यासाठी एकीकडे नाना पटोले यांनी काल 15 नेत्यांच्या टीमची घोषणा केली आहे. तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'फेक नरेटिव्हचा  थेट नरेटिव्ह'ने सामना करु असे म्हटले आहे. यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.

भाजपाचे पुण्यात अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात भाजपाचे नेते, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आपला चौथा शत्रू पक्ष घोषीत केले आहे. आपण केवळ तीन पक्षांविरोध नव्हे तर चौथ्या फेक नरेटिव्ह विरोधात लढत होतो. त्यामुळे लोकसभेत आपल्याला फटका बसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता आपण फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्यायचे असे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. भाजपचे नेते अमित शाहच फेक नरेटिव्हचा खरा मास्टरमाईंड आहे. स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच खरी भाजपाची मानसिकता असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

 

Published on: Jul 21, 2024 05:39 PM