अमित शाह-राज ठाकरे भेटीची शक्यता, मुंबई महापालिका निवडणुकीआधी युती होणार?

अमित शाह-राज ठाकरे भेटीची शक्यता, मुंबई महापालिका निवडणुकीआधी युती होणार?

| Updated on: Sep 05, 2022 | 11:53 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह (Amit Shah) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह (Amit Shah) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता आहे.

Published on: Sep 05, 2022 11:53 AM