अमित शाहांचा पुणे दौरा अन् महाविकास आघाडीत हालचालींना वेग; अजित पवारही अॅक्शन मोडमध्ये…
अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. पाहा काय नियोजन...
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. कसबा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 20 तारखेला पुन्हा कसब्यात अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला काँग्रेसचे मोठे नेतेही उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ता मेळाव्यानंतर आता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी चिंचवडनंतर आता कसब्यात लक्ष केलं केंद्रीत केलं आहे. 20 तारखेला महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.
Published on: Feb 15, 2023 09:53 AM
Latest Videos