Special Report | महाराष्ट्रातलं सत्तांतर आणि राजकारणातले शहं'शाह'

Special Report | महाराष्ट्रातलं सत्तांतर आणि राजकारणातले शहं’शाह’

| Updated on: Jul 03, 2022 | 10:50 PM

अमित शहा यांच्याबरोबर तुम्ही बुद्धीबळ खेळता का त्यावर आनंद काय उत्तर देतात त्याचा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला. त्यांच्या बुद्धीबळ खेळण्याने पटावरील हत्ती, घोडे कसे बाहेर पडतील तेच त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील राजकारण बंडखोर आमदारांमुळे बदललं असं असली तरी त्या मागच्या राजकारणाचा खरा चाणक्य अमित शहाच असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभा, विधानसभा आणि आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्यालाही जबाबदार कोण असा अंतर्गत आणि दबक्या आवाजात विचारण्यात येत असले तरी त्या पाठीमागचा खरा चेहरा हा अमित शहाच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आज विधानसभेत छगन भुजबळ यांनी बुद्धीबळ खेळाच्या विश्वनाथ आनंद यांच्या विनोदाचा किस्सा सांगितला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अमित शहा यांच्याबरोबर तुम्ही बुद्धीबळ खेळता का त्यावर आनंद काय उत्तर देतात त्याचा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला. त्यांच्या बुद्धीबळ खेळण्याने पटावरील हत्ती, घोडे कसे बाहेर पडतील तेच त्यांनी सांगितले आहे.

Published on: Jul 03, 2022 10:50 PM