'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे

‘अमित शाह यांची पवारांवरील टिका…,’ काय म्हणाले एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 21, 2024 | 9:19 PM

महाविकास आघाडी सरकारला आमच्यावर आरोप करण्याचा काही अधिकार नाही. आमच्या सरकारवर गेली दोन वर्षे एक भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त आज आनंद दिघे साहेबांना वंदन करण्यासाठी हजारो शिवसैनिक आले होते. दिघे साहेबांच्या जीवनावर पार्ट 1 आणि पार्ट 2 आले आहेत. त्यांचे जीवन एका भागात दाखविणे योग्य नाही म्हणून दुसरा भाग काढला आहे. दिघे साहेब अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचे त्याप्रमाणे आमचे सरकार देखील काम करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकार योजनेचा निर्णय घेतला वीज बिल माफी, मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याची टिका शरद पवार यांनी केली आहे. याविषयी एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी शरद पवार इतकी वर्षे सरकारमध्ये आहेत. आमच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. त्यामुळे अमित शाह याची टिका योग्यच असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Published on: Jul 21, 2024 09:17 PM