अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची जागर पदयात्रा
मुंबई-गोवा महामार्गाचे गेल्या १७ वर्षापासून काम रखडलेलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तर याच महामार्गावरून मनसे आणि भाजपमध्ये कलगितूरा रंगलेला असतानाच आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर यात्रा निघणार आहे.
मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | राज्यातील अनेक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. तर मुंबई-गोवा महामार्गाची तर पुर्ण चाळण झाली आहे. त्याचे काम गेल्या १७ वर्षापासून रखडलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. तर मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पहाटेपासून जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे.
अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात निघाणारी जागर पदयात्रा ही १६ किलोमीटरची असणार असून यातून सरकारला जागे करण्याचे काम केल जाणार आहे. तर या जागर पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच मनसेचे अनेक नेते कार्यकर्ते तेथे जमा झाले आहेत.
यावेळी मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून आता सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर ही जागर यात्रा मुंबई-गोवा मार्गावर टप्याटप्याने पुढे जाणार आहे.