अमित ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून, सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पोलिसांकडून सभेला परवानगी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता आज अमित ठाकरे हे औरंगाबाद दौरा करणार आहेत. ते आज दुपारी औरंगाबादमध्ये दाखल होणार असून, सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच सभास्थळाची देखील पहाणी करणार आहेत.
Latest Videos