Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात अभिनयच केला ! मंत्री अनिल पाटील यांची टीका

Video | अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात अभिनयच केला ! मंत्री अनिल पाटील यांची टीका

| Updated on: Dec 29, 2023 | 9:19 PM

अमोल कोल्हे सेलिब्रिटी असल्याने ते प्रथम निवडून आले आहेत. त्यानंतर मात्र आपल्या मतदार संघात ते फेल झाले आहेत. सेलिब्रिटी राजकारणात यशस्वी होतेच असे नाही असेही मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे यांनी अभिनयच चांगला करावा, आताही शेतकरी आक्रोश मोर्चातही त्यांनी अभिनयचे केल्याची टीका पाटील यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी मागच्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी किती मोर्चे काढले अशीही टीका त्यांनी केली आहे.

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : अमोल कोल्हे सेलिब्रिटी म्हणून प्रथम निवडून आले होते. परंतू राजकारत अशी व्यक्ती यशस्वी होतेच असे काही म्हणता येणार नाही. परंतू जनतेत ते फेल ठरले आहेत. शेतकरी आक्रोश मोर्चातही त्यांनी अभिनयच केला आहे. त्यांनी अभिनयच करावा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी दिला आहे. कॉंग्रेसच्या रॅलीला काही अर्थच राहीलेला नाही. चार राज्यातील निवडणूकात सपशेल अपयशी ठरली आहे. येणाऱ्या लोकसभेत कॉंग्रेस रसातळाला गेलेली असेल असेही अनिल पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडणारच असे म्हटले आहे. याबद्दल विचारले असताना त्यावर अनिल पाटील यांनी अजित पवारांना सेन्स असल्यानेच त्यांनी असे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता पाटील यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता अनेक बैठका होत राहतील, परंतू निष्पन्न काय होते हे महत्वाचे आहे असे म्हटले आहे.

Published on: Dec 28, 2023 04:57 PM