शिवाजी आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात? अमोल कोल्हे म्हणाले, त्या दाराची किल्ली माझ्याकडे

शिवाजी आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात? अमोल कोल्हे म्हणाले, “त्या दाराची किल्ली माझ्याकडे”

| Updated on: Jul 07, 2023 | 3:26 PM

शिवाजी आढळराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर म्हणून अमोल कोल्हे म्हणाले की,”शिवाजी अढळराव पाटील यांना चार वेळा लोकसभेची संधी देऊनही, स्वार्थासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.राष्ट्रवादी काँग्रेसने मला एकदाच उमेदवारी दिली आणि शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात मी त्याच्या सोबत ठामपणे उभा आहे. हा आढळराव आणि माझ्यामधील मूलभूत फरक आहे. शिवाजी आढळराव पाटील हे मीडियाला एक बोलून, पाठीमागून अडून-लपवून शरद पवार यांना भेटण्यासाठी जी दारे थोटावत आहेत, त्याची किल्ली माझ्याकडे आहे.”

Published on: Jul 07, 2023 03:26 PM